Be yourself; Everyone else is already taken.
— Oscar Wilde.
This is the first post on my new blog. I’m just getting this new blog going, so stay tuned for more. Subscribe below to get notified when I post new updates.
Be yourself; Everyone else is already taken.
— Oscar Wilde.
This is the first post on my new blog. I’m just getting this new blog going, so stay tuned for more. Subscribe below to get notified when I post new updates.





अवघाची राम…!
राम…आज अवघे जग राममय झालंय,१४वर्षांचा वनवास भोगल्यावर जेव्हा प्रभुराम अयोध्येत आले होते, तेव्हा जशी अवध नगरी उत्साहित झाली होती तोच उत्साह …कदाचित। त्याहीपेक्षा जास्त उत्साह आज राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचा आहे. तब्बल ५०० वर्षांनंतर भगवान राम गर्भगृहात स्थानापन्न होत आहेत.
पण मग या ५०० वर्षांच्या कालावधीत राम होते कुठे? वनवासात…? विजनवासात…? की अज्ञातवासात…??? भक्तहो, खरंतर प्रभुरामचंद्र होते तुमच्या आमच्या अंर्तमानात…तुमच्या आमच्या अंतःकरणात…एवढंच काय तर ते होते या सृष्टीच्या चराचरात आणि या पुढेही हजारो वर्षे असेच राहतील प्रकृतीच्या कणाकणात.
राम होते म्हणून तर आजही आपल्या जगण्यात राम आहे. जीवनातल्या प्रत्येक प्रारब्धाला राम भरोसे ठेऊन आपण जगतोय.कोणाला दिसताक्षणी राम राम केला, तर कोणी या इहलोकीची यात्रा संपविली म्हणून त्याला राम नाम सत्य है म्हणत अखेरचा निरोप दिला.
कुणासाठी तो सखा बनून सखाराम झाला, कुणासाठी तो राजाराम झाला. दुष्टांचा नाश करण्यासाठी हातात शस्त्र घेऊन तो परशुराम बनला,तर आपल्या अवती भवती घडणाऱ्या अनेक घटनांमुळे अस्वस्थ झालेल्या मनाला शांत करण्यासाठी तो शांताराम झाला, तर काही वेळेस आत्मिक अनुभूती देण्यासाठी तो साक्षात आत्माराम देखील झाला.
उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला नवी ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी तो कधी प्रभुराम होता, तर कधी रात्रीच्या गर्भात उद्याचा उष:काल दाखविणारा तो रामचंद्र देखील होता.
मातृत्वाच्या निरागस नात्यासाठी तो जसा रामल्लला होता…अगदी तसाच पतिपत्नीच्या नात्यातील ओलावा जोपासण्यासाठी तो रामजी देखील होता. कधी दोन भावंडांच्या अल्लड नात्यातील तो रामानुज होता…तर बहीण भावाच्या नात्यातील तो रामानंद होता.
ज्याच्या मनातील लंकापती रावण निघून गेला त्याच्या मनात साक्षात रघुपती बनून येणाराही तोच होता,मनामनात दास्यभक्ती रुजविणारा रामदास ही तोच होता, आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात कैवल्याचं चांदणं पेरणारा राघव सुद्धा तोच होता.
प्रभातकाली प्रत्येकाच्या मनी चिंतनारा चिंताराम तोच होता,अन पुढे वैखरीतून वदविणार रघुवीर ही तोच होता.
राम कशात नव्हता… तो आपल्या भजनात होता,तो आपल्या कीर्तनात होता,माऊलींच्या ज्ञानेश्वरीत होता,अन तुकोबांच्या गाथेतही होता,महाराणा प्रतापांच्या चेतक घोड्यातही होता,अन छत्रपती शिवाजी महाराजांच्या तळपत्या तलवारीतही होता. तो सावरकरांच्या त्यागातही होता आणि लोकमान्यांच्या देशभक्तीत ही होता,तो कुसुमाग्रजांच्या कवितेत होता आणि अत्रेंच्या लेखणीत ही होता.बाबासाहेब पुरंदरेंच्या वाणीतही होता,अन मराठी मनाला चेतविणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या ठाकरी बाण्यातही होता…एवढंच काय तर अगदी आत्ता हिंदुत्वाचा अंगार फुलविणाऱ्या मोदी आणि योगींच्या शिष्टाचारातही तोच आणि फक्त तोच आहे..!!
तो कुठेच गेला नाही आणि जाणार ही नाही, जोपर्यंत शबरीची श्रद्धा आणि भरताचा बंधुभाव आहे, लक्ष्मणाची मर्यादा, हनुमानाची भक्ती अन सीतेचं पावित्र्य आहे तोपर्यंत तो अखंड राहील…युगानुयुगे आपल्या सर्वांच्या तनामनात, अंतरीच्या अंतरात,प्रत्येक घराघरात आणि घरातल्या प्रत्येकाच्या मनामनात….!!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय श्रीराम
या वर्षीचा पावसाळा हा प्रत्येक माणसाच्या कायम लक्षात राहील,कारण पावसानं उशिरा केलेली सुरुवात,मध्ये केलेली जोरदार बॅटींग,कोल्हापूर, पुणे इथला महापूर,आणि अगदी दसऱ्यापर्यंत ठोकलेला मुक्काम या साऱ्याच बाबी लक्षात राहण्यासारख्या आहेत
” निसर्गाचं गणित बिघडलय” अशी ओरड प्रत्येकानेच केली ….. पण निसर्ग असा अचानक का बिघडला ? तो बिघडला, की त्याला बिघडायला भाग पाडले? आणि जर त्याला बिघडायला भाग पाडले असेल तर ते कोणी भाग पाडले हा खरा प्रश्न आहे….आणि या प्रश्नाचे उत्तर हे मानवानेच शोधावे लागेल.
पक्षांना कधी “सेकंड होम” ची गरज पडली का ? प्राण्यांना कधी “मिनरल प्लांट” उभारावा लागला का? या पशु पक्ष्यांना कधी अँड्रॉइड फोन किंबहुना मोबाईल ची गरज भासली का? मग माणसालाच का या सगळ्याची गरज भासली….त्याचं एकमेव कारण म्हणजे माणसाला असलेली भौतिक सुखाची हाव.भौतिक सुखाच्या नादात माणसाने स्वतःच्याच मृत्यूचा सापळा रचून ठेवलाय हे त्याला कळलेच नाही
पर्यावरण संवर्धन हा शब्द आता परवलीचा झाला आहे. वाढती कारखानदारी,रासायनिक खतांचा अति प्रमाणात वापर, वाहनांची वाढती संख्या, आणि या साऱ्यातून होणारे जल प्रदूषण,वायूप्रदूषण हे सारे चिंतेचे विषय होऊन बसले आहेत.
संवेदनशील माणसाच्या मनाला या साऱ्या गोष्टी खटकत आहेत,अस्वस्थ करीत आहेत त्या अस्वस्थतेतूच पर्यावरण संरक्षण ही संकल्पना पुढे आली आणि काही जागरूक मंडळी यावर काम करायला सिद्ध देखील झाली….!
जलप्रदूषण सारखा विषय घेऊन त्यावर काम करणारे,आणि खऱ्या अर्थाने जलक्राती घडवण्यासाठी स्वतःला झोकून देणारे हिरवळ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष, जलनायक किशोर धारिया…! विकास तर व्हायलाच हवा, रोजगार निर्मिती देखील हवी,आणि प्रदूषण नियंत्रण पण हवे यासाठी एम एम ए च्या सहयोगाने सी ई टी पी च्या माध्यमातून प्रदूषण रोखण्यासाठी काम करणारे संभाजी पाठारे……!जंगलात लागणाऱ्या (कि लावल्या जाणाऱ्या) वनव्या सारखा धगधगता विषय घेऊन तो विझविण्यासाठी हातात त्याच जंगलातील झाडाच्या झावळ्या घेऊन त्या वनव्यातच उडी घेणारा किशोर पवार…..!
एकीकडे विकासाच्या नावाखाली झाडांची बेसुमार कत्तल होत असताना,दुसरीकडे स्वतःच्या 100 एकर जागेत भारतीय वंशाची झाडे लावून जंगल उभं करणारे नंदू तांबे…!
वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहून आयुर्वेदिक महत्व लक्षात घेऊन तीच उपचार पद्धती स्वीकारणारे व त्यातून निसर्ग संवर्धन करणारे डॉ राजीव तलवार… कधीकाळी श्रीमंती चे प्रतीक असलेली आणि गो माय वसते लक्ष्मी हे ब्रीद मिरवणारी भारतीय गाय निसर्ग संवर्धनासाठी किती महत्वाची आहे हे पटवून देणारे व शेकडो शेतकऱ्यांना गो दान करून गायीचे संवर्धन करणारे पंचगव्य सिद्ध मिलींद धारप….. धीरज वाटेकर, प्रणव क्षिरसागर, डॉ सृजन धारप,रूपा दवणे ह.भ.प. मोहिरे महाराज ही आणि यांच्या सारखी अनेक मंडळी आज या परिवर्तनाच्या वाटेवरचे प्रवासी होऊन आपापल्यापरीने पर्यावरण संरक्षण करण्यासाठी काम करीत आहेत,यांचे हे काम आज नक्कीच आशादायक आणि प्रेरणादायी आहे
या वर्षीचा झेप अंक हीच प्रेरणा आणि हाच आशावाद आपल्यासमोर घेऊन येत आहे
आज प्रत्येकाला सुख हवंय,प्रत्येकाला चांगले पर्यावरण हवे,पण स्वतः मध्ये बदल करून नाही तर हे सारे आपोआपच व्हायला हवे आणि ते कधीच शक्य नाही.खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण बदलायला हव्यात जसे की बाजारात जाताना कापडी पिशवी घेऊन जाण्याची सवय आपण स्वतःला लावून घेण्याची गरज आहे, प्रवासात घरची पाण्याची बाटली सोबत घ्यायला हवी,शून्य कचऱ्यासारखी संकल्पना राबवायला हवी….असं खूप काही करता येऊ शकते
आणि या साऱ्या सकारात्मक गोष्टींची सुरुवात आपल्या स्वतःकडून व्हायला हवी तरच परिवर्तन घडेल…..नाही तर निसर्ग कठोर झाल्याशिवाय राहणार नाही….!
चला तर मग या परिवर्तनाच्या वाटेवरचे आपण ही सहप्रवासी होऊया…!
झेप च्या १५ वर्षांच्या वाटचालीत अनमोल साथ देणाऱ्या व पाठीवर कौतुकासह विश्वासाची थाप देणाऱ्या सर्व वाचक,जाहिरातदार,हितचिंतक यांना दिवाळीच्या पर्यावरण पूरक शुभेच्छा
मागच्या दोन आठवड्यापासून पावसानं महाडमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला,आणि या पुरासोबत व्हाट्सप वर देखील मेसेजेस चा महापूर आला (वृत्तवाहिन्यावर ज्या पद्धतीने *सर्वात प्रथम* ची स्पर्धा असते अगदी तशीच स्पर्धा व्हाट्सप ग्रुपवर पहायला मिळाली)
हे सारं एका बाजूला घडत असताना काही वेडे तरुण मात्र वेगळ्याच चिंतेने ग्रासले होते आणि ती चिंता होती बचावकार्याची. ..!
कोणत्याही तकलादू प्रसिद्धी साठी धडपड नव्हती…..कोणत्याही प्रकारचा आततायीपणा नव्हता…..कसलीही भीती नव्हती…..की कसलीही चमकोगिरी नव्हती…..होता तो फक्त संयम,चिकाटी, आणि समोरच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी ची मनापासून ची धडपड…..!
खरतरं आपत्कालीन परिस्थिती आणि सिस्केप हे आता समीकरणच झाले आहे. रायगड,आंबेनळी, कुडपण इथं पासून सुरू झालेला हा प्रवास अगदी केरळ ते हिमाचलपर्यंत पोहोचला.
दरीत कोसळलेली प्रेते असोत,अथवा घरात घुसलेले साप असो भर वस्तीत आलेली मगर असो अथवा पुरात अडकलेले नागरिक असोत साऱ्यांच्या मदतीला टीम सिस्केप सदैव तत्पर…..!
बरं ह्या सगळ्या मोहिमा यशस्वी झाल्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावर ना गर्विष्ठपणा की ना श्रेयवादासाठीची धडपड…. ना फोटोसेशन की ना बाईट्स साठी घुटमळणे…… उलट काम पुर्ण झाल्यावर एखाद्या *कर्मयोग्याप्रमाणे* दुसऱ्या जबाबदारी साठी तय्यार….!
खरोखरच टीम सिस्केप म्हणजे सुरक्षेसाठीच एक *अभेद्य कवच*….! सिसकेपीयन्स म्हणजे *तत्परता* आणि आपत्कालीन परिस्थितीत हक्काचा *आशेचा किरण*…..!
मित्रांनो, मी जरी सिस्केप चा सचिव असलो तरी खरे काम तुमचे आहे……तुमच्यामुळेच माझ्यासारख्याला ओळख….!
*सलाम तुमच्या कार्याला अन प्रणाम तुमच्या धैर्याला*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*अविनाश घोलप*
अलाैकीक साैंदर्यानं नटलेलं कुडपण
सकाळचे आठ वाजले हाेते ,सिस्केप चा बीजाेत्सव रद् झाला हाेता, बाहेर धाे-धाे पाऊस पडत हाेता त्यातच शनिवार असल्यामुळे सुट्टी हाेती, इतकं सारं जुळून आलं असताना हा याेग मला वाया घालवायचा नव्हता.
मिलिंदजीं ना फाेन केला, म्हटलं काय करायचं…..मिलिंदजीं नी दुस-या सेकंदाला सांगितलं कुडपण ला जायचं…….बस्स बाईक घेतली अन् निघालाे….
पाेलादपूर पासून महाबळेश्वर च्या दिशेला जाताना लेप्रसी हॉस्पीटल च्या पुढे उजव्या बाजूला गेलाे की ताे रस्ता कुडपण ला जाताे.
मुळात पाेलादपूर हा तालूका तसा डाेंगर द-यात वसलेला, एकीकडे ढवळ्यातून मनाला भूरळ घालणारा चंदनगड आपल्याला दिसताे, तर दुस-या बाजूला शिवरायांच्या प्रतापाची साक्ष देणारा प्रतापगड, एका भल्यामाेठ्या डाेंगरावर काेणीतरी छाेटा डाेंगर ऊचलून ठेवल्याचा भास करून देणारा आेंबळीचा “मीठाचा खडा” असाे अथवा एका माेठ्या दगडाला एका निष्णात कारागिरानं तासून तिक्ष्ण टाेक बनवावी असा टाेकदार दिसणारा कांगाेरी असाे, रायरेश्वराला रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्याचं रणशिंग जिथे फुंकले त्या ” राय-याच्या मु-या” चे कामथ्याच्या कुशीतून हाेणारे दर्शन असेल, किंवा नरवीर तानाजी मालूस-यांच्या समाधीला नतमस्तक हाेवून पुढे साक्षात त्या समाधीला अभिषेक घातल्याचा भास करून देणारा “माेरझाेत” चा धबधबा असेल….या सा-या गाेष्टी पाेलादपूरचं वैभव आहेतच परंतू या नैसर्गिक अविष्कारातलं माेरपिस म्हणजे शेलार मामांचं कुडपण……!
पाेलादपूर पासून जेमतेम २७ ते २८ किमी हा प्रवास परंतू बाईक वरून फिरताना किमान दाेन ते अडिच तास लागतात. एकतर पुर्ण चढाई,त्यातच डाेंगर तासून तयार केलेला नागमाेडी रस्ता,आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हांला जागाेजागी थांबायला भाग पाडणारं नैसर्गिक साैंदर्य..….!
माेरगीरी,खडपी,गांजवणे,देवपूर अशी गावे पार केल़्यावर आपण एका फाट्यावर येताे,जिथून पुढे सरळ एक रस्ता काेतवाल ला जाताे व डाव्या बाजूचा रस्ता कुडपण ला जाताे. पुढे गाेळेगणी पास केल़्यावर क्षेत्रपाळ पासून उजव्या बाजूला वळलाे की कुडपण चा घाट सुरू हाेताे.
क्षेत्रपाळ गावातून जर हा रस्ता पाहिला की या रस्ताची खरी गंमत कळते, आपल्या छबीन्यातले आकाश पाळणे खालून पाहणा-या ची जशी अवस्था असते काहीशी तशी अवस्था हाेते,एका बाजूला कापलेला उंच डाेंगर, दुस-या बाजूला खाेल दरी,आणि डाेंगराच्या त्या धारेतून जाणारी एस टी ची गाडी ! हे चित्र फार मनमाेहक आहे ( हा रस्ता हिमाचल च्या कांगडा व्हॉली आठवण करून देताे)हा सारा प्रवास आपण जीव मुठीत घेवून करत असताे, त्या भेदरलेल्या वातावरणात असतानाच आपण खिंड पार करताे आणि झपकण आपल्या डाेळ्यावर अंधार येताे, काही दिसेनासं हाेतं, आपण भांबावलेल्या नजरेनं आ वासून पहात असताे…… तेवढ्यात समाेरच्या दरीतून धूक्याचा लाेट उठताे…. सारं वातावरण व्यापून टाकताे ….. त्या सा-या परिस्थितीचा आपण अंदाज घेत असतानाच त्या काळ्याकुट्ट वातावरणात एक पांढरीशुभ्र रेघ त्या गिरिशिखरांवर उमटलेली दिसते….. थाेडं सावध हाेवून अंदाज घेत असता आपल्या लक्षात येतं की ती पांढरी रेघ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या महाकाय गिरिशिखरांवरून काेसळणारा प्रचंड माेठा प्रपात आहे……!
हळूहळू धूक्याची ती चादर नाहीसी हाेते… आभाळ स्वच्छ हाेतं… हिरवेगार वनश्रीने नटलेले ते डाेंगर नजरेस पडतात …… आणि मघाशी त्या गिरिशिखरांवर उमटलेल्या रेघेचं प्रतीबिंब आपल्या चेह-यावर उमटतं, आणि या नैसर्गिक अविष्कारात आपण हरवून जाताे………!
अलाैकीक साैंदर्यानं नटलेलं कुडपण (उत्तरार्ध)
आपण जेव्हा एखादा धबधबा पाहताे तेव्हा बहुतांशी असं हाेतं की, आपण त्या धबधब्याच्या तळाशी असताे,मात्र कुडपण चा हा धबधबा याला अपवाद आहे. हा धबधबा आपण त्याच्या उगमस्थाना पासून पहात असताे. थाेडक्यात आपण याचा माथा पाहू शकताे मात्र तळ पाहू शकत नाही.
खेड, चिपळूण मध्ये वाहणा-या जगबूडी नदीचे उगमस्थान म्हणजे हा कुडपण चा धबधबा…..!
एकतर महाबळेश्वर मध्ये तांडव नृत्य करून दमलेला पाऊस शांत व्हायला पाेलादपूर मध्ये येताे, शिवाय सह्याद्रीच्या डाेंगररांगामुळे धूक्याची देखील एक मस्त दुलई पसरलेली असते….त्यावेळी ख-या अर्थानं आपण ढगात गेल्याचा अनुभव घेत असताे.
हा संपूर्ण परिसर फिरताना आपल्या लक्षात येते की निसर्गाने इथे मुक्तहस्ते उधळण केली आहे. अनेक प्रकारचे वृक्ष, पक्षी, प्राणी यासारख्या जैवविविधतेनं नटलेला हा प्रदेश आहे.
महसूली रचनेनुसार कुडपण चे दाेन भाग पडतात. कुडपण खुर्द व कुडपण बुद्रूक. परंतू लाेकांनी त्यांच्या साेयी नुसार याचे कुडपण १, कुडपण २, व कुडपण ३ असे भाग केलेत. अनेक छाेटे छाेटे साकव व नागमाेडी रस्त्याने एकमेकांना जाेडलेले हे भूभाग, डाेंगराच्या एकाच धारेत वसलेले आपल्याला पहायला मिळतात.
रायगड जिल्ह्य़ातलं शेवटचं गाव म्हणजे कुडपण परंतू याच साेबत रत्नागिरी व सातारा या दाेन्ही जिल्ह्य़ांच्या सिमा या गावाला स्पर्श करतात.
इथल्या निसर्गा प्रमाणेच इथली जगरहाटी. ईथल्या लाेकांनी त्यांचं जगणं फार साेप करून घेतल्याचं आपल्याला दिसतं. एकीकडे माेबाईला रेंज नसली तरी अस्वस्थ हाेणारे आपण, आणि दुसरी कडे निसर्गाने जे आयुष्य वाट्याला दिलयं त्यात समाधानानं जगणारी सही इथली माणसं……!
पाेटाची खळगी भरण्यासाठी भिवाच्या काठीवरून पायपीट करून,प्रतापगडाचा डाेंगर पाऊण तासात पार करणारी महिला पाहीली अन् थक्क झालाे. घरातलं अठराविश्व दारीद्र्य असून देखील “मला पाच मुलं आहेत” असं काैतुकानं सांगणा-या त्या महिलेला जेव्हा भेटलाे तेव्हा घरातली कर्मकहानी न सांगता ती महीला “सर जेवून जा ” असं म्हणते तेव्हा आपल्याच खुजेपणाची कीव येते…….!
महाराष्ट्र शासनानं कुडपण ला पर्यटन स्थळाचा दर्जा दिलाय. शासन पातळीवर विकासात्मक प्रयत्न सुरू आहेत. ते सारं हाेईल तेव्हा हाेईल.
परंतू ईथल्या मातीनचं यांना साेशिक बनवलयं, या सह्याद्रीच्या रांगांनी बळ दिलयं, इथलं माेकळं आभाळचं यांना आपुलकीचा पाठ देतं,अन् इथला निसर्गचं यांना जगण्याची उमेद देताे……!
—- अविनाश घाेलप